R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश " देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये." केंद्रीय...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

 

राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक कोळसा साठवणूकीचे नियोजन करण्याचे कळवले असताना राज्य सरकारने कोळशाची साठवणूक केली नाही आणि आता केन्द्र सरकारवर ठपका ठेवत आहेत, ही जनतेची दिशाभूल आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळशाचा पुरवठा होत नसल्याच्या संदर्भातील आरोपासंदर्भात दानवे बोलले.

महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्याही कारणासाठी केन्द्र सरकारवर आरोप करत सुटलेले असते मग ते करोना असो,अतिवृष्टी असो,शेतकऱ्यांचे नुकसान झाले, मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण काही झाले की केन्द्र जवाबदार, असे बोलण्याचा त्यांना हा एकमेव छंद लागलेला आहे. देशातील सर्व राज्य सरकारकडून कोळशाची मागणी होते त्यानुसार पुरवठा करण्यात येतो आज आवश्यकतेनुसार भरपूर प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना त्यांचे म्हणणे आहे की कोळसा नाही.

देशात चाळीस लाख मेट्रिक टन कोळसा भांडारात उपलब्ध आहे कोळसा खाण केन्द्रावर सात लाख मेट्रिक टन कोळसा अतिरिक्त साठवलेला आहे. भयंकर पाऊस झाल्यानंतर सुध्दा आमच्या अधिकार्यांनी व कामगारांनी रात्रंदिवस अतिशय जोखीम घेऊन सातत्याने मेहनतीने प्रयत्न करत काम करून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कोळशाचे उत्पादन केले आहे असे दानवे म्हणाले.

महाराष्ट्र राज्याला, कोल इंडिया ने अनेक पत्र लिहून त्यांचा कोळश्याचा हिस्सा त्यांनी उचलावा असे वारंवार सांगितले होते. मात्र महाजनकोने त्या पत्राची दखल न घेता कोणत्याही प्रकारचे शेड्युल कोल इंडिया कडे पाठवले नाही .कोळशाचे योग्य नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्रात हि परिस्थिती निर्माण झाली आहे.

परदेशातून वीस टक्के कोळसा आपल्या देशात येतो तो महाग झाला आहे मात्र त्यापेक्षा अधिक कोळशाचे उत्पादन आपण केले आहे गतवर्षीच्या तुलनेत आपले उत्पादन वाढले आहे भारतात पर्याप्त कोळसा उपलब्ध आहे चिंता करण्याचे काही कारण नाही राज्य सरकारचे नियोजन फसले त्यांनी पावसाच्या पूर्वी आवश्यक साठा केलेला नाही असे दानवे यांनी सांगितले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘टाटा’ ने जागा पाहिली औरंगाबादेत अन् गुंतवणूक केली नवी मुंबईत

  किया मोटार्स काॅर्पोरेशनने जानेवारी २०१७मध्ये डीएमआयसीतील 'ऑरिक'मध्ये येण्याऐवजी आंध्र प्रदेशला पसंती दिली. त्यानंतर ऑरिकमध्ये मोठा प्रकल्प येण्याच्या नुसत्याच चर्चा आणि घोषणा झाल्या. जानेवारी २०२०...

एअर इंडिया नंतर मोदी सरकारने दुसऱ्या मोठ्या विक्रीला दिली मंजुरी

  नवी दिल्ली | एअर इंडियानंतर मोदी सरकारने आता सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. अर्थात सीईएल नंदल फायनान्स अँड लीजिंगला २१० कोटी रुपयांत विकण्यास मंजुरी दिली आहे....

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ धामला देणार भेट

  नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केदारणातच दर्शन घेण्यसाठी रवाना होणार आहेत. पंतप्रधानांच्या केदारनाथ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments