R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना भवनासमोरच मनसेने लावला बॅनर 'गर्व से कहो हम हिंदू है'

शिवसेना भवनासमोरच मनसेने लावला बॅनर ‘गर्व से कहो हम हिंदू है’

 

मुंबई | शिवसेना पक्षाने जोरदार दसरा मेळाव्याची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईत दसऱ्याच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा देत सेनेला डिवचले आहे. मनसेने शिवसेना भवना समोरच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ चा बॅनर लावला आहे. याखेरीज मुंबईत काही ठिकाणी असे पोस्टर्स लावण्यात आलेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.

शिवसेनेची स्थापना झाली ती मुळात हिंदुत्वाचा नारा देत आणि मराठी माणसाठी शिवसेना. आता शिवसेनेचा हा मुद्दा मनसेने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गडात अर्थात दादरमध्ये तेही शिवसेना भवनासमोर बॅनर झळकवले आहे. त्यामुळे आता शिवसेना बॅनरच्या माध्यमातून उत्तर देणार की थेट दसरा मेळाव्यात खडेबोल सुनावणार याची उत्सुकता आहे. आता या बॅनरवरुन राजकारण तापणार हे स्पष्ट होत आहे. आगामी पालिका निवडणुकीत हा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. बंदीस्त सभागृहातील उपस्थिती मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने प्रवेशाची शक्यता आहे. षण्मुखानंद सभागृहाची आसन क्षमता 3 हजार आहे. त्यामुळे या मेळाव्यात शिवसेनेचा जोश दिसणार हेच दिसून येत आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments