R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति आमचे राज्यात २२ खासदार होणार, २०२४ मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी

आमचे राज्यात २२ खासदार होणार, २०२४ मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी

 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज षण्मुखानंद हॉल येथून राज्यतील तमाम शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. याच अप्र्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या भविष्याबद्दल भाष्य केले आहे. तसेच राज्यात शिसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर आता राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांशी संपर्क वाढवलेला आहे. तसेच पक्षविस्तारासंदर्भात ते वेगवेगळी विधानं करताना दिसतात. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त बोलताना त्यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. दादरा आणि नगर हवेलमीमधून आमचा आणखी एक खासदार निवडून होईल. आमचा आकडा २२ वर जाईल, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.

संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी शिवसेनेची आगामी वाटचाल, भूमिका यावर भाष्य केले. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण ४८ जागांपैकी १८ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल, असे भाकीत संजय राऊत यांनी वर्तवले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments