R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'आता तर थेट सरकारच विरोध करु लागलंय' मोहन भागवत यांची आघाडी सरकारवर...

‘आता तर थेट सरकारच विरोध करु लागलंय’ मोहन भागवत यांची आघाडी सरकारवर टीका

 

विजयादशमीचा सण हा देशभरात साजरा केला जात आहे. राजकीय दृष्ट्या देखील दसरा सणाला महाराष्ट्रात मोठं महत्व आहे. कारण याच दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा, भगवान गडावर पंकजा मुंडे तर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात. दरम्यान, आरएसएस’च्या शस्त्रपूजन सोहळ्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणादरम्यान राज्यातील ‘ठाकरे सरकार’ जोरदार निशाणा साधला आहे.

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन केलं होतं. यावेळी राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून ‘बंद’ आंदोलन केलं होतं. याच मुद्द्यावरुन भाजपने या तीनही पक्षांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता मोहन भागवत यांनी देखील निशाणा साधला आहे.

‘भारत देश हा विकासाच्या मार्गावरुन मोठा होणारा देश आहे. त्याच मार्गावरुन पुढे जात आहे. हे होऊ नये, हिंदू समाज आपल्या ‘स्व’ला समजू नये आणि तसाच विखुरलेला राहावा यासाठी खूप प्रयत्न सुरु आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments