R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड 'मी चांगला वडील नाही', आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

 

अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार आहेत. त्यानंतर याप्रकरणी काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान शाहरूख खान नेहमी त्याच्या तीन मुलांबद्दल बोलत असतो. परंतु एकदा शाहरुख खानने लहान मुलगा अबरामबद्दल सांगितले होते की त्याने एक दिवस अबरामला बोलावले पण तो शाहरुख खानकडे आला नाही. त्यानंतर शाहरुख खानच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

अभिनेता शाहरुख खानने एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मी एक दिवस अबरामसोबत बसलो होतो. मी त्याला माझ्या जवळ बसायला सांगितले. पण तो तिथून निघून गेला, माझ्या जवळ येऊन बसला नाही. म्हणून मी असे विचार करू लागलो की मी एक चांगला वडील नाही. मी माझ्या मुलांवर प्रेम केले नाही? अशी खंत त्याने बोलून दाखवली होती.

पुढे शाहरुख म्हणाला, ‘मी माझ्या कामाला जास्त वेळ देतो का? मी मुलांना वेळ देऊ शकत नाही. एक दिवस तो एका मुलीसोबत उभा राहील आणि मला सोडून जाईल.’
दुसऱ्या मुलाखतीत शाहरुख खानने आपल्या मुलांबद्दल एक गोष्ट शेअर केली. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता की तो अजिबात प्रोटेक्टिव्ह वडील नाही. मी प्रोटेक्टिव्ह वडिलांसारखा दिसतो पण तसे नाही. त्यांच्या आयुष्याचे निर्णय मी घेऊ शकत नाही. शाहरुखचे मुले कायम चर्चेत असतात.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments