R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसू लागलेत; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसू लागलेत; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

 

 

मुंबई | शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजेच शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यंदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ५३ मिनिटं ३० सेकंदाच्या भाषणात बहुतांश वेळ भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विविध मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली. मात्र आता भाजपने सुद्धा जशाच तसे उत्तर दिले आहे.

“दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही,” असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राणे पाठोपाठ अनेक भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात,” असं ठाकरे म्हणाले.
हिंमत असेल तर पाडून दाखवा

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments