R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुझे भाजप मैं जाने को कहा है, अब मैं कुंभकर्ण की तरह...

मुझे भाजप मैं जाने को कहा है, अब मैं कुंभकर्ण की तरह सो गया हुँ | हर्षवर्धन पाटलांची मुख्यमंत्र्यांकडून मिमिक्री |

 

शिवसेनेचा दसरा मेळावा दणक्यात माटुंगातील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. पण, पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची चक्क जाहिरातीची नक्कल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची खिल्ली उडवली.

प्रकरण असे की, दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभेतून आपण भाजपमध्ये आल्यापासून शांत झोप लागते, ना कोणती चौकशी ना, कुठे ईडीची नोटीस असं काहीही होत नाही, अशी कबुलीच हर्षवर्धन पाटील यांनी देऊन टाकली. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच खिल्ली उडवली.

हर्षवर्धन पाटील अनाहुतपणे बरोबर बोलून गेले. भाजपमध्ये गेल्यावर शांतपणे झोप येत आहे. ही लोक तिकडे ब्रँड अँबेसडर सारखी वागत आहे. टिव्हीवर जाहिराती येते ना,’ पहिले तो मुझे निंद की गोली खा के भी निंद नही आती ती थी, दरवाजे पर टक टक होती, तो भी निंद नही आती. फिर मुझे भाजप मैं जाने को कहा है, अब मैं कुंभकर्ण की तरह सो गया हुँ, टकटक किया तो भी उठता नही’ असं भाजपमध्ये गेलेल्या लोकांचं झालं आहे. अशा लायकीचे लोक आपल्याला धमक्या देत आहे. आमच्या अंगावर आला तर सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments