R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति ...मग राज ठाकरेंना बाहेर का पडावं लागलं, देवेंद्र फडणवीसांनी 'त्या' विषयावर केले...

…मग राज ठाकरेंना बाहेर का पडावं लागलं, देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ विषयावर केले भाष्य

 

मुंबई | शुक्रवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि शिवसैनिकच मुख्यमंत्री बनेल याचा पुनरूच्चार केला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? असा सवाल केला.

“दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि मान्य करा तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती. राजकारणात महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. परंतु त्याच्या मागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते, देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही. जर मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर राणेंना का पक्षाच्या बाहेर जांवं लागलं. राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे असं म्हणत फडणीवसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता.

सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी सरकार पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही. कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा. तुमच्याकडे सत्ता आहे मदत करून दाखवा, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाकारलं नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आणि शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले असा टोला सुद्धा लगावला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments