R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे" काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाहीये. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीमधील एक सदस्य असलेल्या हरीश रावत यांनी भाष्य केले आहे.

काँग्रेस पक्ष कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही. त्यांनी आधी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि नंतरच आपले ज्ञान पाजळावे, अशी टीका हरीश रावत यांनी प्रशांत किशोर यांच्यासंदर्भात केली आहे. हरीश रावत यांच्या या भूमिकेनंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच वादाला नवे तोंड फुटू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे

रावत म्हणाले की, कोणतीही व्यक्ती जी भारताची नागरिक आहे आणि स्वतंत्रता आंदोलन तसेच काँग्रेसवर, काँग्रेस विचारसरणीवर विश्वास ठेवणारी आहे, ती व्यक्ती पक्षात प्रवेश करू शकते. त्यामुळे प्रशांत किशोरही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. आम्ही नेहमीच नवीन विचारांचे स्वागत केले आहे. मात्र, काही झाले, तरी काँग्रेस पक्ष कोणाही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही. ती व्यक्ती कितीही सक्षम असली, तरी आता सगळे तुम्हीच सांभाळा, असे काँग्रेसमधील कोणीही म्हणणार नाही. आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि नंतर ज्ञान द्यावे, असा टोला हरीश रावत यांनी लगावला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments