R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

 

मुंबई | मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी विरोधी पक्षावर तसेच सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जनतेने नापास करूनही तुम्ही सत्तेत आला आहोत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधनाता फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा संविधान बदलायचा मनसुबा दिसून येत आहे. हे भ्रष्ट्र सरकार आहे. काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात फडणवीस यांच्यावर कडाडून हल्लाबोल करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिहल्ला चढवला. जनतेने नापास करूनही तुम्ही सत्तेत आहात अशी टीका फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांचा संविधान बदलायचा मनसुबा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. तसेच काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर आहे, असे आयटी छाप्यात उघड झाले आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील सरकार हे वरपास झाले आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर शिवसैनिकाला का मुख्यमंत्री बनवले नाही. तुम्ही महत्वकांक्षी आहात. नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का जावे लागले आहे, असा प्रश्न फडवणीस यांनी यावेळी उपस्थित केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments