R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश ...पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

…पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

 

राज्यात आघाडीसह सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले होते.तसेच त्यांच्या आरोपणानंतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी सुद्धा टाकल्या होत्या. आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नातेवाईकावर गंभीर आरोप लावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यात गुंतवणूक करणार असेल तर त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनाही उत्तर द्यावं लागणार आहे, असं सांगतानाच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. उद्धव ठाकरे हे बायकोच्या नावाने १९ बंगल्याचे घोटाळे करत आहेत, असा टोला सोमय्या यांनी लगावला.

अजित पवारांनी स्टेटमेंट केलं पण मग मी पुरावे ठेवले ना, मग पार्टनरशिप मागे का घेतली? असा सवाल करतानाच अजित पवार यांनी जमवलेली माया उघड केली. ९ दिवसांच्या धाडीचा दुसरा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे. हे १००० कोटींचे बेनामी व्यवहार आहेत. यात १५ मोठे सहकारी, पत्नी मुलगा, बहीण यांच्या नावाखाली घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments