R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "मी पुन्हा येईन' म्हणणारे सत्तेत नसल्याने.' शरद पवारांचा टोला

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

 

 

पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बऱ्याच वर्षांनी मी पिंपरीत आलो आहे. मला चार वेळा इथल्या लोकांनी लोकसभेमध्ये पाठवलं आहे. सामान्य जनतेचे आज प्रश्न वाढत आहेत. मात्र मोदी सरकारला जनतेच्या प्रश्नांची आस्था नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

आज शरद पवारांनी बोलताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा गैरमार्गाने वापर करत आहे. अनिल देशमुख यांच्यावरील झालेले आरोप आणि त्यांनी लगेच राजीनामा दिला. ज्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले ते आयुक्त आरोप करून गायब आहेत. मोदी सरकार आयुक्त कुठं गेले आहेत, याची माहिती मोदी सरकार देत नाहीत. मोदी सरकारने त्यांच्या माहिती देणाऱ्या संस्थांचा वापर करून माहिती द्यावी, अशी मागणी पवारांनी मोदी सरकारकडे केली आहे.

राज्यात सत्ता नसल्यानं मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस सत्ता नसल्यानं अस्वस्थ आहेत. तसेच ईडी आणि एनसीबी सारख्या संस्था आधी खूप कमी लोकांना माहित होत्या. पण आज या संस्थांची नावे लोकांना नावं ऐकायला येतात. नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीचा वापर करून ससेमिरा लावला. त्यानंतर त्यांना मिळालेल्या जामिनावरून पवारांनी तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच एनसीबीच्या कारवाई दरम्यान जे पंच आणतात, ते सर्व पंच गुन्हेगार आहेत. त्यांचा खरा चेहरा समोर आला की ते सर्व फरार झाले आहेत, अशी टीका देखील शरद पवारांनी यावेळी केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments