R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "विद्या चव्हाण माझ्यावर आरोप करताना आपल्या डोक्यावर पिकलेल्या केसांची तर लाज ठेवा"

“विद्या चव्हाण माझ्यावर आरोप करताना आपल्या डोक्यावर पिकलेल्या केसांची तर लाज ठेवा”

 

भाजपा महिला नेत्या चित्र वाघ यांनी महाविकास आघाडीवर महिला अत्याचार्यांच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला आमदार विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांनी प्रतिउत्तर दिले होते. आता वाघ यांनी चव्हाण यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. विद्या चव्हाण यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. माझ्यावर आरोप करताना स्वतःची नाही तर, किमान आपल्या डोक्यावर पिकलेल्या केसांची तर लाज ठेवायला पाहिजे होती. माझ्यावर आरोप करण्याची नीच पातळी विद्या चव्हाण यांनी गाठली अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

विद्या चव्हाण यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे त्याच क्षणी मी राजकारण सोडून देईल मात्र, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना मी सोडणार नाही असा इशारा वाघ यांनी केला. राज्यात जनमतातील सरकार नसून, जुगाडू सरकार आहे.नेत्यांची भाषण अशी सुरू आहेत की, जसं एक बाई दुसरा बाईला टोमणे मारते. आताच्या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, सर्वसामान्य महिलांच्या बरोबरच महिला पोलिसांवर अत्याचार आणि बलात्कार झाले आहेत.

अशा घटनांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाते. माझा असा दावा नाही की केवळ याच सरकारच्या काळात अशा घटना घडतात मात्र अशा घटनांवर सरकार काय भूमिका घेते याबाबत माझा आक्षेप आहे, सरकार या घटनांमधील नराधमांना शासन करण्याऐवजी त्यांना आश्रय देते हे दुर्दैवी आहे असं वाघ म्हणाल्या.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments