R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच भाजप नेत्यांची बेताल बडबड'- सामना'तून टीका

‘कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच भाजप नेत्यांची बेताल बडबड’- सामना’तून टीका

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. राज्यात विरोधात बसलेल्या आणि केंद्रातील मोदी सरकारवर उद्धव ठाकरे बसरले होते. त्यानंतर विरोधक भाजपने सुद्धा मुख्यमंत्र्यांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली होती. आता या टिकेला आजच्या सामना अग्रलेखातून प्रतिउत्तर देण्यात आलेले आहे.

‘भाजप आणि केंद्रातील त्यांचे सरकार लोकशाही मानत नाही. प्रश्न विचारणाऱ्याला ते संपवतात. घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षातला मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच त्यांना अशा कल्पना सुचतात,’ अशी टीका शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?’ असा अलोकशाही प्रश्न उपस्थित केल्याचा,’ उल्लेखही यात करण्यात आला आहे. एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री बनले या विरोधकांच्या टीकेला सुद्धा शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘उद्धव ठाकरे हे शिवसैनिकच आहेत आणि कोणी परकीय राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. ते कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री बनले याचं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी वाजत गाजत लाखो लोकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून शपथ घेतली नाही.’ असा टोला शिवसेनेनं लगावला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments