R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश पुन्हा एकदा विखे पाटलांनी नाव न घेता साधला मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर...

पुन्हा एकदा विखे पाटलांनी नाव न घेता साधला मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा !

 

नगर | २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केला होता. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांनी नगरचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडणे सुरूच ठेवले होते. आता पुन्हा एकदा विखे पाटील यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

विखे पाटील यांनी कोणाचंही नाव न घेता टीका केली होती . मात्र, त्यांची तोफ ही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येत.माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सनसनाटी आरोप केला. हा मंत्री कोण, असं काही माध्यमांनी विचारलं तर राधाकृष्ण विखे पाटलांकडून उत्तर मिळालं ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ त्यांनी थोरातांचं नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांचा निशाणा मात्र काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांकडेच होता, हे स्पष्टपणे दिसतं.

थोरात यांच्याकडे महा विकास आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्रीपदाची जबाबदारी आहे. थोरातांच्या खात्यावर बोट ठेवत अप्रत्यक्षरित्या या खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं विखे पाटील म्हणाले. त्याबरोबरच नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, अशी पत्रिका पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर मध्ये केली आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments