R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये मनसेचा होणार मेळावा

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये मनसेचा होणार मेळावा

 

मुंबई | आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. राज ठाकरे स्वत: या महापालिकांकडे बारकाईने लक्ष देत आहेत. गेल्या महिनाभरात नाशिक, पुण्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे.

येत्या २३ ऑक्टोबरला मुंबईतील भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

नाशिक आणि पुणे पाठोपाठ मनसेने मुंबई मनपा काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच डिजिटल प्लॅटफॉमच्या माध्यमातुन सुद्धा राज ठाकरे यांना घराघरात पोहचवण्यासाठी मनसेने तयारी सुरु केली आहे.

प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नवनिर्माणाच्या विचारांना follow करत, राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांच्या कार्याला like करत, महाराष्ट्र धर्म share करत, अन्यायाविरोधात comment करत मनसेचे वादळ उठवू या! निवडणुकीतील विजयाकडे नेणारा डिजिटल राजमार्ग बांधूया! असे म्हणत मनसेने एक पोस्ट शेअर केली आहे.

 

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments