R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे

केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे

 

कोल्हापूर | केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी दिसून आलेले नाहीये. त्यातच आता पुन्हा एकदा शेट्टी यांनी थेट मोदी सरकार आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

साखर कारखान्यांनी उसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसते मग ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्यांचे एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसे, असा सवाल करत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो, तरी शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांत आघाडीवर असेन, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवरून नाव कमी करण्यात आल्याच्या चर्चांनंतर राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तसेच पूरात प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याबाबतही राजू शेट्टी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता शेतकऱ्यांना टोपी घालण्याच्या बाबतीत नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच असून, किंबहुना त्यांचे एकमत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments