R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर, प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा

देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर, प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा

 

अकोला | केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलून दाखविले होते आता त्यांच्या या भूमिकेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केले असून, देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंबेडकर यांनी अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देश हुकुमशाहीच्या वाटेवर असल्याचे मत मांडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे जुनेच आहे, पण आता सगळ्यांना त्याची जाणीव व्हायला लागली आहे. संविधान बदलणार, नवीन संविधान आले, तर हुकुमशाही येण्याची शक्यता आहे. त्या हुकुमशाहीला आपण तोंड देऊ शकणार नाही. म्हणून ते आता आपापल्या मतदारांना सांगत आहेत.’

तसलेच आता हे पक्ष आपल्या मतदारांना आपण संविधानवादी झालं पाहिजे, असं सांगत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. स्वागतार्ह आहे. देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशा काही घटना घडताना दिसतील की, ज्या तुम्हाला आश्‍चर्यकारक वाटतील, अशी परिस्थिती आहे’, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments