R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांतील असतील. यांसह ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका येथील १० टक्के भूभागही समुद्राच्या पाण्याखाली जाईल.

त्याचप्रमाणे बेट असलेले अनेक देशही नष्ट होतील, अशी चेतावणी पर्यावरण शास्त्रज्ञांनी एका अहवालातून दिली आहे. ‘पूर्वी ५० वर्षांतून एकदा उष्णतेत वाढ होत होती, ती आता प्रत्येक वर्षी होत आहे. ही परिस्थिती पृथ्वीची उष्णता वाढत असल्याचे द्योतक आहे’, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१. ‘क्लायमेट कंट्रोल’ या संकेतस्थळावर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांतील लोकसंख्या अधिक आहे. तसेच हे देश कोळशावर आधारित उद्योग उभारण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा (‘ग्लोबल वार्मिंग’चा) सर्वाधिक फटका या देशांना बसणार आहे.

२. जगातील जे देश ‘हाय-टाईड’ प्रदेशात (उच्च समुद्री पातळी असलेल्या प्रदेशात) येतात, तेथील समुद्राची पातळी वाढल्यामुळे जगातील १५ टक्के लोकसंख्येवर त्याचा परिणाम होईल. या अभ्यासाप्रमाणे जगातील १८४ ठिकाणांवर समुद्राच्या वाढत्या पातळीचा थेट परिणाम होईल.

३. या अभ्यासाप्रमाणे पुढील २०० वर्षांपासून २ सहस्र वर्षांमध्ये पृथ्वीचा नकाशा पालटलेला असेल. जर जागतिक तापमान हे १.५ डिग्रीपासून ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढले, तर हिमनद्या वितळतील. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून जगातील मोठा भाग पाण्याखाली जाईल.

४. अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने ‘सी लेव्हल प्रोजेक्शन टूल’ (समुद्राच्या पातळीचा भविष्यातील अंदाज घेणारे यंत्र) बनवले आहे. वरील अहवालाच्या काही मास आधी आलेल्या ‘इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’च्या (‘आयपीसीसी’च्या) एका अहवालाप्रमाणे वर्ष २१०० पर्यंत जगाला प्रचंड उष्णता सहन करावी लागेल आणि तापमानामध्ये ४.४ डिग्री सेल्सिअसची वाढ होईल. पुढील २ दशकांमध्येच तापमान १.५ डिग्री सेल्सिअसने वाढेल. त्यामुळे हिमनद्या वितळतील.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments