R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या खासदार रक्षा खडसे देणार आपले सासरे एकनाथ खडसे यांना जिल्हा बँक निवडणुकीत...

खासदार रक्षा खडसे देणार आपले सासरे एकनाथ खडसे यांना जिल्हा बँक निवडणुकीत टक्कर

 

जळगाव | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे विरुद्ध भाजप खासदार रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने भाजप स्वतंत्र लढणार आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते.

मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला. त्यामुळे आता जळगावात खडसे विरुध्द खडसे राजकीय सामना दिवसण्याची शक्यता आहे. याआधी अजिंठा विश्रामगृहावर १६ ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी नेते तथा माजी आमदार सतीष पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments