R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेवर सुद्धा ईडीची धाड पडली होती तसेच त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तीला अटक करण्यात आले होते.

आता त्या पाठोपाठ शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने पुन्हा समन्स जारी केला आहे. त्यातच त्यांना २० ऑक्‍टोबर रोजी आपल्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे. त्यांच्यावरही मनी लॉंड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भावना गवळी या यवतमाळ-वाशिमच्या खासदार आहेत. त्यांना या प्रकरणात या आधी ४ ऑक्‍टोबर रोजी समन्स जारी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही तारीख बदलून मागितली होती. त्यांना आता नव्याने २० ऑक्‍टोबर साठीचे समन्स जारी करण्यात आले आहे. त्यांना ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये हजर राहायचे आहे. त्यांच्यावर जे प्रकरण दाखल आहे, त्या प्रकरणात सईद खान यांना सप्टेंबर महिन्यातच अटक केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments