R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने थेट आक्रमण करावे"

“बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने थेट आक्रमण करावे”

 

बांगलादेशात हिंदूंच्या ६६ घरांची नासधूस करण्यात आली आहे तसेच जवळपास २० घरे जाळण्यात आली. माध्यमाच्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात दुर्गा पूजेदरम्यान मंदिर तोडफोडीच्या घटनांनंतर कथित निंदनीय मीडिया पोस्टवरून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. यानंतर भारतातील हिंदू संघटनांनी याचा तीव्र विरोध करत केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. यातच आता एका भाजप नेत्याने बांगलादेशवर आक्रमण करावे, असे म्हटले आहे.

बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधल्या हिंदू संघटनांनी अमेरिकेतील बांगलादेश दूतावासासमोर निदर्शने केली. तसेच अजूनही अनेक देशांतील बांगलादेश दूतावासासमोर हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही आक्रमक पवित्रा घेत अन्यथा भारताने आक्रमण करावे, असे म्हटले आहे.

स्वामी म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने आक्रमण करावे, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. दोन-तीन दिवसांपासून बांग्लादेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू वस्त्यांना टार्गेट केले जात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments