R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची 'कुठे नेवून...

“कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची ‘कुठे नेवून ठेवला आहे भारत माझा”

 

आघाडीच्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यावर घणाघाती आरोप केले जात असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर फक्त भाजपाला प्रतिउत्तर देण्याचा ठाकरे आणि पवार कुटुंबीयांनी ठेका घेतला आहे का? तसेच सत्तेत बसलेल्या इतर मंत्र्यांनी सुद्धा बोललेलं पाहिजे असे विधान संजय राऊत यांनी केले होते. आता त्या पाठोपाठ याच विषयाला धरून आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केले आहे.

भाजपला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं जाधव यांनी म्हंटल आहे. भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं असून आता विरोधकांच्या टीकेला सर्व मंत्र्यानी आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी विधान केले होते. तसेच मनमोहन सिंह यांच्या काळात आंदोलन करणाऱ्या भाजपाला नेत्यांना जादव यांनी टोला लगावला होता.

ते म्हणाले की, २०१४ पूर्वीची भारतीय जनता पक्षाची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की हे डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येकवेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची ‘कुठे नेवून ठेवला आहे भारत माझा’, असा टोला त्यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला लगावला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments