R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

 

ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. आघाडी सरकार येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. त्याकरिता महाविकास आघाडीतील सर्वपक्षांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिला.

काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. थोरात म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही, कॉंग्रेसच्या काळात एक रुपयाची जरी इंधन दरवाढ झाली तरी भाजपकडून आंदोलन केले जात होते. आता भाजपचे कार्यकर्ते लपून बसले आहेत का? त्यांचा शोध घेण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

ईडीसारख्या यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर सुरू असल्याचे आता लहान मुलांनासुद्धा समजायला लागले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चौकशी होत नसल्याने शांत झोप लागते, असे विधान केले होते. त्याचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, पाटील यांचे हे विधान भाजपमधील नेत्यांवर कारवाई होत नसल्याचा स्पष्ट पुरावा आहे. राज्यातील सरकार कमकुवत करण्याचे, पाडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी भक्कम आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments