R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अमृता फडणवीस म्हणतायत माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? तर भाजपा आमदार महाले...

अमृता फडणवीस म्हणतायत माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? तर भाजपा आमदार महाले म्हणतात की,

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. त्यावरुन राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी टीका सुद्धा केली होती. तर दुसरीकडे भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी अनिल देशमुख वयाने मोठे आहेत. त्यांचा आदर आम्ही नक्कीच करतो. मात्र, त्यांनी चौकशीला सामोरं जायला हवं, असं म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांनी देशमुखांवर केलेल्या टीकेबाबत श्वेता महाले यांना विचारण्यात आलं. त्यावेळी हा संस्काराचा विषय नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख वयाने मोठे आहेत. त्यांचा आदर आम्ही नक्कीच करतो. तसंच ते जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे ते चौकशीला सामोरे का जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतोय.

तसेच शरद पवार ईडी चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार होतात, पण अनिल देशमुख का होत नाही? असं महाले यांनी विचारलंय. तर अमृता फडणवीस या उपरोधिकपणे बोलल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सिनियर नेत्या म्हणून विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनीही महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे, असा खोचक टोलाही महाले यांनी लगावलाय.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments