R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

 

मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदकुमार हेगडे यांनी आक्षेप घेतला आहे. एका टायर कंपनीच्या जाहिरातीत आमीर खानने केलेल्या आवाहनावरून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. सीएट टायरच्या एका जाहिरातीत आमीर खान याने रस्त्यावर फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे. पण, त्यावर हेगडे यांनी आक्षेप घेतला आहे.

अनंत कुमार हेगडे यांनी सीएट टायरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वर्धन गोएंका यांना पत्र लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात की, आमीर खान यांनी दिलेला संदेश योग्य आहे. सामाजिक प्रश्नांवर तुमच्या विचारांचं स्वागत आहे. पण, हिंदूंच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. पण, रस्त्यावर निर्माण होणाऱ्या अजून एका समस्येकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो.

ते पुढे म्हणाले की, शुक्रवारी आणि महत्त्वाच्या सणांवेळी नमाजाच्या नावाखाली मुस्लीम समुदायाकडून रस्ता अडवला जातो. अनेक शहरांमध्ये आधीच रहदारी असलेले रस्ते अडवले जातात आणि रस्त्यावर नमाज अदा केला जातो. त्यावेळी रुग्णवाहिकेसह अन्य वाहनं पण अडवली जातात. त्यांचा खोळंबा होतो. प्रवासी आणि रुग्ण वाटेतच अडकतात. यामुळेही नुकसान होतं, असं ते पत्रात म्हणाले आहेत.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments