R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय, अजित पवारांचे सूचक विधान

आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय, अजित पवारांचे सूचक विधान

 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दीडवर्षांपासून बंद असलेली चित्रपटगृह आणि नाट्यगृह आजपासून जनतेसाठी कोरोनाच्या संसर्गाचे नियम पाळून सुरु करण्यात येणार आहे. राज्यसरकारने परवानगी दिल्यानंतर आजपासून नाट्यगृह, चित्रपटगृह खुली झाली आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह सुरु झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी पवार यांनी आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय आहे, मात्र मी पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली’ असे म्हंटले. त्यांच्या या विधानानंतर एकच हशा पिकला.

​उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अनेकवेळा भाषणा दरम्यान विनोद केले जातात. आज त्यांनी पुणे येथे असाच एक विनोद केला. त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याला आले असता. त्यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहाचा शुभारंभ करण्यात आला होता यावेळी त्यांनी पवार शैलीत विधान केली होती.

यावेळी ते म्हणाले की, आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय आहे. पण आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली. कोरोनामुळे लोकांमध्ये निराशा आली होती. पण आता तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार केला जाईल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments