R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश मुंबईत सर्वात उचं इमारतीच्या १९ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशामक दलाच्या १५...

मुंबईत सर्वात उचं इमारतीच्या १९ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशामक दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल

 

मुंबईतील सर्वात उंच इमारतीमध्ये आग लागली आहे. सदर आग लालबाग परिसरात एका उंच इमारतीला आग लागली आहे. अविघ्न पार्क इमारत असं या इमारतीचं नाव आहे. सध्या आज विझवण्यासाठी आजूबाजूच्या अग्निशामक केंद्रातून गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली. इमारतीच्या दोन्ही बाजूंनी ही आग पसरत असल्याचं दिसून येत आहे. आग काही प्रमाणात वरच्या बाजूला विसाव्या मजल्यावरही पोहोचल्याचं आढळून येत आहे. लालबागचा हा परिसर चिंचोळ्या गल्ल्यांचा आहे. तसंच या परिसरात वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडचणी येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, इमारतीतून एक व्यक्ती पडतानाचं दृश्यही समोर आलं आहे. आगीमुळे बाहेर पडता येत नसल्याने इमारतीच्या 19 व्या मजल्याच्या गॅलरीत ही व्यक्ती लटकत होती. पण हात सुटल्यामुळे ही व्यक्ती खाली पडल्याचा व्हीडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान क्रेनच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचले आहेत. ते पाण्याचा मारा करत आहेत. पण आगीपर्यंत पाण्याचा फवारा पोहोचत नसल्याचं दिसून येतं.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments