R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला...

पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी मंत्र्यांवर आणि आघाडीच्या नेत्यावर बेछुड आरो लगावले आहे. त्यातच आता माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी थेट आघाडीवर टीका केली आहे. महाराष्ट्रात महाआघाडी सरकार आल्यापासून एकही ठोस स्वरुपाचे काम दिसून येत नाही. भाजपच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे ते भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेले आहे अशी टीका शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ. विखे आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले राज्यात आघाडी सरकारने एकही काम केले नाही. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, बंधारे तुटली, शेतीचे नुकसान झाले, विजेचे पोल वाकले. मात्र या सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. डिपी जळाली तर जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत डीपी चालू केली जात नाही.

तसेच या सरकारच्या काळात सिंगल फेज बंद करण्याचे काम करण्यात आल्याची टीका कर्डिले यांनी केली. भाजप सरकार असताना आ. बबनराव पाचपुते व माजी मंत्री राम शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी पूर्णतः मतदारसंघात लक्ष देऊन मतदार संघाचा विकास केला. मात्र, सध्याचे पालकमंत्री शोधून सापडत नाहीत. त्यांचा शोध घेण्याची वेळ आली असल्याची टीका हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता कर्डिले यांनी केली.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments