R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

 

सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपा आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यांवर हल्ला चढवला होता ‘माझी कसलीही चौकशी लावा, ईडी, इन्कम टॅक्‍सला मी घाबरत नाही. कोणाला काही करायचे असेल तर करा, आमच्यात दम आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, युतीच्या काळात सर्वाधिक विकास निधी आणून मी कामे केली आहेत. माझ्यावर भाजपवाले करत प्रेम होते, त्यावेळी शंभर कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता. पक्षाशी आणि अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे, त्यांचे आम्ही पाईक आहोत, याची त्यांना कल्पना आहे असाही त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

किरीट सोमय्या येथे आला होता. मी अजितदादांना म्हटले आम्हाला परवानगी द्या, एकदाच त्याचा तोतरेपणा बाहेर काढतो. आपण रोज बघतोय, सकाळी ईडी लावायची, चौकशी सुरु होती, ईडी आणि इन्कम टॅक्‍स आहे, नार्कोटिक्‍स आहे. काय राजकारण चाललय, याला लोकशाही म्हणतात का, असा सवाल शिंदे यांनी केला होता.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments