R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "मी साखर कारखाने विकत घेतले माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचुक"

“मी साखर कारखाने विकत घेतले माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचुक”

 

जरंडेश्वर साखर कारखानाच्या मुद्द्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लगावले होते. आता या आरोपांना अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. २ 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा आरोप खोटा आहे. साखर कारखान्यांबाबतीत खोटी आकडेवारी सादर करून आरोप केले जात असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.

अजित पवार पुढे म्हणाले, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा असून वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही उपयोग नाही. तसेच सध्या खोटी आकडेवारी दाखवून आरोप केले जात आहेत. गेल्या पंधरा वर्षात 64 सहकारी साखर कारखाने विकले किंवा चालवायला दिले. त्यातील काही कारखाने फडणवीस सरकारच्या काळातदेखील विकण्यात आलेत. दोन-चार कोटी रूपयांना देखील कारखान्यांची विक्री झाली आहे. या साऱ्या कारखान्यांची यादी मी तुम्हाला दिलीय.कारखाने कुणी-कुणी घेतले त्याचा शोध आता तुम्हीच घ्या, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

जरेंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची विक्री ही पूर्णपणे कायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य बँकेने त्या कारखान्याची विक्री केली आहे. यात कोणताही घोटाळा किंवा नियमबाह्य काहीही झालेले नाही. केवळ बदनामी करण्यात येत आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले . तसेच पवार यांनी पत्रकार परिषदेत 64कारखान्यांची यादीच वाचून दाखवत कोणता कारखाना किती रकमेला विकला गेला ती आकेवारी वाचून दाखविली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments