R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची 'पाकिस्तानी मैत्री' भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

 

पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पंजाब राज्याच्या राजकानात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. अशातच आता पंजाब सरकारनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळच्या सहकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी पत्रकार अरूशा आलम यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. आलम यांच्यावर आयएसआयसोबत काम करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. परिणामी आलम यांची आपण चौकशी करणार का? असं पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांना विचारलं असता, वरिष्ठ पोेलीस अधिकाऱ्यांना आलम यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचं रंधावा म्हणाले आहेत.

आरूशा आलम या सुरक्षा पत्रकार आहेत. अमरिंदर सिंग आणि आलम यांची चांगली मैत्री आहे. आरूशा आणि कॅप्टन अमरिंदर यांची पहिल्यांदा भेट २००४ मध्ये झाली होती. अमरिंदर सिंग यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पण आलम भारतात आल्या होत्या. अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा या मैत्रीचा उल्लेख केला आहे. अमरिंदर सिंग अनेकदा आलम यांच्या मैत्रीमुळं अडचणीत आले आहेत.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments