R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये" भाजपच्या महिला नेत्याचं अजब...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून आपल्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करण्याचे काम करताना दिसून आले आहे. आता त्या पाठोपाठ भाजपच्या महिला नेत्याने महिलांना ५ च्या नंतर पोलीस स्थानकात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

वाराणसीतील बजरडीहामध्ये भाजपाच्या वाल्मिकी महोत्सव अंतर्गत मलिन वस्ती येथे महिलांसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. बेबी रानी मौर्य या कार्यक्रमात संबोधित करत होत्या. महिलांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊ नये, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. इतकंच नव्हे, तर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं.

“पोलीस ठाण्यात महिला अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक जरी उपलब्ध असले तरी मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते की संध्याकाळी ५ वाजल्यानंतर म्हणजेच अंधार झाल्यानंतर महिलांनी पोलीस ठाण्यात कधीच जाऊ नये. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात जावं आणि अगदीच गरज असेल तर आपला भाऊ, पती किंवा वडिलांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जावं”, असं बेबी रानी मौर्य म्हणाल्या.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments