R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं - संभाजी ब्रिगेड

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

 

मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात परतीच्या पावसाने अक्षरश: हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आता संभाजी ब्रिगेड ही संघटना पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील खरीप हंगाम हा पुर्णपणे वाया गेला त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडने धर्मादाय सहआयुक्तांकडे अर्ज केला आहे. या अर्जामध्ये देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेत मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी विनंती केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदिप कणसे यांनी या अर्जाद्वारे ही विनंती केली आहे. तसेच यापुर्वी जेजूरी येथील मार्तंड देवस्थान ट्रस्टनेही या पुर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मदत केली असल्याचा उल्लेखही या अर्जामध्ये करण्यात आला असून विनंतीची तात्काळ स्वरूपात गंभीर दखल घ्यावी, असं देखील नमूद केलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments