R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा "फोकस" चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?

छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा “फोकस” चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?

 

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा “फोकस” का नाही वळला असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्य शासनाने या चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी अशी मागणी केली. राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आज आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या मध्ये जयंत पटेल, रमेश थोरात यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता.

यावेळी पत्रकारांना माहिती देताना आमदार अँड शेलार म्हणाले की, राज्यात सुमारे 10 हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शन करुन आपली कला सादर करतात. तसेच त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोना काळात गेल्या दिड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंताचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशील पणे विचार करण्याची गरज होती.

तसेच ते म्हणाले की, कर्नाटक, चंदिगड सारख्या राज्यांनी आप-आपल्या राज्यातील कलावंताना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत पण या उपेक्षित घटकाकडे त्यांचा फोकस वळला नाही याची आठवण करुन देण्यासाठी आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले. तसेच या कलावंताना सरकारने मदत करावी अशी मागणी केल्याची माहिती दिली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments