R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या स्वतंत्रवीर सावरकरांना बदनाम करण्याचा नियोजित कट, सामना अग्रलेखातून मांडली रोखठोक भूमिका

स्वतंत्रवीर सावरकरांना बदनाम करण्याचा नियोजित कट, सामना अग्रलेखातून मांडली रोखठोक भूमिका

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधीच्या सल्ल्यानुसार माफी मागितली होती असे विधान काही दिवसांपूर्वी मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उदगार काढणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

 

सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले. सावरकरांना सातत्याने खलनायक ठरवण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांसाठी ते नायकच आहेत, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते आणि  खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

 

या लेखात संजय राऊत लिहितात की, विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांना परकीयांनी छळले आणि आज स्वकीय त्यांचा छळ करत आहेत. सावरकरांचे उत्तुंग क्रांतिकार्य, देशासाठी त्यांनी केलेला त्याग विसरून काही लोक सावरकरांना माफी मागून सुटलेला वीर अशी संभावना करत असतात. हा एक कट आहे. गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली, असे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

 

मात्र सावरकरांच्या चारित्र्यहननाचे नवे उद्योग सुरू झाले. सावरकरांनी आपल्या क्रांतिपर्वात माफी मागण्याशिवाय काहीच केले नाही, असे काही लोकांना वाटते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अंगावर एक चटोराही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा करतात. मात्र सावरकरांसारख्या क्रांतिकारकांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात क्रांतिकारकांची फौज तयार केली.

 

सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या. ते काळेपाणीच होते. या शिक्षा पूर्ण भोगल्या असत्या तर ते २३ डिसेंबर १९६० रोजी पन्नास वर्षे झाल्यावर त्यांची सुटका झाली असती. अंदमानच्या अंधाऱ्या गुहेत खितपत पडत मरण्यापेक्षा युक्तीने बाहेर पडावे, मग देशसेवेत मग्न व्हावे, हा विचार सावरकरांनी केला. सावरकरांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागचा राजकीय संदर्भ आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते, हे लक्षात येते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments