R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सातारा क्रीडा संकुलनाच्या मुद्दयावरून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तत्कालीन पालकमंत्र्यावर केली...

सातारा क्रीडा संकुलनाच्या मुद्दयावरून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तत्कालीन पालकमंत्र्यावर केली टीका

 

सातारा | ”मी नाही… मी नाही… करणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे अतोनात नुकसान केले. शून्य आकारात स्टेडियम बांधले की व्यापारी संकुल? ज्यांनी हे पाप केले अशा तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या व पालकमंत्र्यांच्या मुस्काटात लावली पाहिजे,’ असे खळबळजनक वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे केले. क्रीडा क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर येथील विश्रामगृहात उदयनराजे यांनी आपल्या संतप्त भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या.

उदयनराजे म्हणाले, ”ज्यांनी सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे वाटोळे केले, अशा तत्कालीन व्यक्तींची नावे घेण्याचीसुद्धा माझी इच्छा नाही. त्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. मोक्‍याच्या जागा सातारकरांनी गमाविल्याने साताऱ्याच्या क्रीडा परंपरेला मोठा धक्का बसला आहे. स्टेडियमचा धावमार्ग आयताकृती लागतो हा तर गोल स्वरूपाचा आहे. जोड्याने मारलं पाहिजे. ज्या पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी मला विरोध केला आणि कारण नसताना मी विरोध करत आहे, असे दाखवले.

हे कोणी केले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल. म्हणून मी नाव पण घेत नाही. हे लोक जोड्यापुढे उभे करायच्या लायकीचे नाहीत. सगळीकडे घाण. साधे तुम्ही रणजी ट्रॉफीचे सामने घेऊ शकत नाहीत. यांनी सातारकरांना संपूर्ण झिरो करायचेच ठरवले आहे. त्याला आयताकृती मैदान लागते.’ ते कुठून करायचे, असा सवाल उदयनराजेंनी केला आहे. त्याकाळी शाहू स्टेडियमवर रणजी ट्रॉफी भरवल्या जात होत्या. मात्र, आता भरवता येत नाहीत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments