R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "मतं मागायला आल्यावर पायतान घेऊन उभे रहा", पडळकरांचा शेतकऱ्यांना सल्ला

“मतं मागायला आल्यावर पायतान घेऊन उभे रहा”, पडळकरांचा शेतकऱ्यांना सल्ला

 

भाजप नेते गोपीचंद पडळकर हे सध्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीकरिता प्रचार करत असून या प्रचारादरम्यान पडळकर महाविकास आघाडीवर चांगलंच तोंडसुख घेत आहेत. त्यातच आता पडळकरांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून झालेल्या गोंधळावर भाष्य करताना ‘भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे आर्थर रोड तुरुंगात असतील’, असा दावाच गोपीचंद पडळकरांनी केला आहे. फक्त राजेश टोपीचा नव्हे तर यावेळी पडळकरांनी आणखी काही मंत्र्यांवरही टीकेची संधी साधली आहे.

‘मतं मागायला आल्यावर पायतान घेऊन उभे रहा’, असा सल्ला पडळकरांनी लोकांना दिला. नांदेडमधील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पडळकर यांनी राज्याचे सार्वजनिक धकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधत हे लक्ष्य केलं आहे. त्याचसोबत, यावेळी पडळकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही डिवचलं आहे.

पडळकर म्हणाले की, ‘जनाब संजय राऊत’, असा उल्लेख करत टीका करताना पडळकर म्हणाले की, ‘शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. तुमच्यासारख्या भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही’ अशी टीका पडळकर यांनी केली होती

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments