R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ पाकिस्तानविरोधातील पराभवानंतर रोहितबद्दल विराट म्हणाला की..

पाकिस्तानविरोधातील पराभवानंतर रोहितबद्दल विराट म्हणाला की..

 

विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून पराभवाला समोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारताचा दहा विकेट्सनं पराभव करत इतिहास रचला. आतापर्यंत विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानकडून एकदाही पराभवूत झालेला नव्हता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली.

या सामन्या विराट-पंत वगळता इतर फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे हार पत्करली होती. भारतीय संघानं दिलेलं १५२ धावांचं आवाहन पाकिस्तान संघाने एकही विकेट्स न गमावता पार केलं. सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीनं पराभव स्वीकारात स्पष्टीकरण दिलं. यावेळी पत्रकाराची बोलती बंद केली.

रोहित शर्माला संघाबाहेर ठेवणार का? या प्रश्नावर विराट कोहलीला पहिल्यांदा हसू आवरले नाही. स्वत:ला सावरुन आश्चर्यचकित होत तो म्हणाला की, तुम्ही रोहित सारख्या फलंदाजाला टी-२० संघातून बाहेर काढणार?…हे खरेच अविश्वसनीय आहे. रोहित हा क्रिकेटविश्वातील अव्वल दर्जाचा फलंदाज मानला जातो.

पुढे विराट म्हणाला की, तुम्हाला वाद हवाय… तसं असेल तर आधी सांगत चला… त्याप्रमाणे मी बोलत जाईल, असं म्हणत विराट कोहलीनं पत्रकाराचं तोंड बंद केलं. संघाचं संतुलन नव्हतं का? यावर बोलताना विराट कोहली म्हणाला की, माझ्या दृष्टीनं जो संघ बेस्ट असेल त्यानुसार मी उतरलो आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर

इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद...

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात

  टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात केली असून बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं ५ विकेट्सनं विजय...

” सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही” नेटकऱ्यांचा संताप

  मुंबई | ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments