R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेना पुन्हा एनसीबी कार्यालयात राहावे लागणार हाजीर

ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेना पुन्हा एनसीबी कार्यालयात राहावे लागणार हाजीर

 

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना अभिनेता चक्की पांडे याची अभिनेत्री अनन्या पांडे हीचं नाव समोर आल्याने खळबळ माजली होती. अनन्या पांडेच्या घरी छापेमारी झाली आणि तिची तब्बल 3 तास चौैकशी करण्यात आली.

अनन्या पांडेला आता पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता अनन्या पांडेला आज सकाळी 11 वाजता एनसीबीच्या कार्यालयात पुन्हा एकदा हजर राहावं लागणार आहे. त्यामुळे अनन्या पांडेच्या अडचणी मात्र संपता संपत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यापूर्वी सुद्धा चौकशीला तब्बल ४ तास उशीर झाल्यामुळे वानखडे यांनी सुनावले होते

आर्यन खानसोबत झालेल्या ड्रग्स प्रकरणाच्या चॅटच्या आधारावर अनन्या पांडे ही चौकशीच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबाबत त्या दोघाचं बोलणं झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पण हे सर्व आरोप अनन्याने चौकशीदरम्यान फेटाळून लावले आहेत. तसेच चौकशीला उशिरा हजर राहिल्याने समीर वानखेडे हे अनन्यावर भडकल्याचंही त्यावेळी सांगितलं गेलं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments