R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ‘या’ वकिलाच्या माध्यमातून समीर वानखेडेंनी बॉलिवूडमधून खंडणी वसूल केली’

‘या’ वकिलाच्या माध्यमातून समीर वानखेडेंनी बॉलिवूडमधून खंडणी वसूल केली’

 

आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने समीर वानखडे यांच्यावर जो आरोप केला आहे त्याची चौकशी केली जाणार असून एनसीबीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत त्यासाठी दाखल होत आहे अशी माहिती देण्यात आली आहे. आता त्या पाठोपाठ मंत्री नवाब मलिक यांनी समर वानखडे प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

मलिक यांनी अभिनेत्यांकडून खंडणी कथित वसूली करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या दलालाचे नाव जाहीर केले आहे. कलाकारांकडून खंडणी वसूल करुन त्यांना वकीलपत्र मिळवून देणारा अयाज खान नामक व्यक्ती असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्राच्या अधारे केला आहे.वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली कशी झाली, याचा खुलासाही मलिकांनी या पत्रात केला आहे.

तसेच सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास एनसीबीकडे सोपविण्यात आल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन संचालक राकेश अस्थाना यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सांगून वानखेडे यांची विभागीय संचालक पदी नेमणुक केली होती. बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना दिले गेले होते.

गुन्हे दाखल होताच कोट्यवधी रुपये वसुली केली गेली. त्यातील वाटा राकेश अस्थाना यांनाही मिळाला होता. दीपिका पादुकोन, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांच्याकडून पैसे घेतले गेले. अयाज खान नामक वकिलाने ही खंडणी वसुल केली होती्. हा अयाज खान समीर वानखेडे यांच्या वतीने बॉलिवूडमधून पैसे गोळा करतो असा दावा मलिक यांनी केला आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments