R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे मनसे कामगार सेना कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक झालेली पाहायला मिळत असताना मनसे कामगार संघटनेचा वाढत असलेल्या दबदबा आणि कर्मचारी वर्गाचा मनसेला मिळत असलेला पाठिंबा कुठेतरी शिवसेना कामगार सेनेला खटकताना दिसून येत आहे.

अशातच आता पवई येथील L&T या कंपनीतील कामगारांच्या समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सोमवारीकंपनीत पोहोचली होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक, विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि रोहन सावंत आपल्या सहकाऱ्यांसमवेत कंपनीत पोहोचले होते. दरम्यान, कामगारांच्या समस्या मांडून मनसेची कामगार सेना कंपनीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या कामगारांनी काही कामगारांना एकट्यात पाहून अरेरावी करण्यास सुरवात केली.

मात्र दुसरीकडे कामगारांचे प्रश्न सोडवणे महत्वाचे असताना कामगारांसाठी काम करणाऱ्या सेना कामगार सेनेने हे कृत्य मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना खटकले होते. सेना कामगार संघटेनेकडून कर्मचारी वर्गाला करण्यात आलेल्या अरेरावी भाषेवरून मनसे कामगार सेना कामगारांना घेऊन पवई पोलिस ठाण्यात पोहोचली आहे. आत्तापर्यंत कंपनीतील मालकांकडून कामगारांसोबत गैरव्यवहार केला जात होता. पण आता राजकीय पक्षांकडून कामगारांवर असे अत्याचार होत असतील त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments