R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ड्रग्स सेवन प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

ड्रग्स सेवन प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

 

मुंबई | क्रुझवर एनसीबीनं छापा टाकत अनेकांना ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलं. चौकशीमध्ये झालेल्या खुलास्यांमुळे त्याला अटक करण्यात आलं. अटकेनंंतर आर्यन आता मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. अशातच आज त्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आर्यन खानच्या जामीनासाठी त्याचे वकिल सतीश मानशिंदे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयानं तो जामीन अर्ज फेटाळत आर्यनला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावली होती. त्याच्या सुटकेसाठी त्याचे वकिल मानशिंदे अतोनात प्रयत्न करत आहे.

आता आर्यन खानच्या वतीने जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहीन, अशी माहिती भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिली. त्यामुळे आता आर्यनला जामीन मंजूर होणार की नाही याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तसेच २९ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच पुढील तीन दिवसांत आर्यनच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली नाही तर त्याला दिवाळीही जेलमध्येच घालवावी लागण्याची शक्यता आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments