R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

 

मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब मलिक रोज नवीन नवीन खुलासा करून वानखडे यांच्या जातीवर आणि आडनावावरुन वरून अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. आता त्यापाठोपाठ होत असलेल्या आरोपांवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास एका नवीन अधिकाऱ्याकडे सोपवू शकते.

एनसीबीच्या सूत्रांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की,’आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकारी वानखेडेचा मुद्दा सोमवारी एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. वानखेडे यांच्याविरुद्ध दक्षता चौकशीचे आदेश दिलेले असल्याने त्यांनी तपास सुरू ठेवणे योग्य नाही, असे अधिकाऱ्यांचे मत होते. बुधवारी एन्सीबाचे उच्च पदस्थ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या मुंबई भेटीनंतर एजन्सी अंतिम निर्णय घेईल परंतु उच्च अधिकारी बदलांवर विचार करत आहेत.’

क्रूझ शिप अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणारे मुंबई प्रादेशिक युनिटचे प्रमुख समीर वानखेडे सोमवारी रात्री राष्ट्रीय राजधानीत पोहोचले. क्रूझ शिप अंमली पदार्थ प्रकरणात वानखेडे यांच्यासह एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांनी आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप एका साक्षीदाराने केला होता. त्यासाठीच्या NCB च्या दक्षता तपासाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे दिल्लीत आले होते.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments