R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या समीर वानखेडेंबाबतची अनेक सत्य आम्ही जगासमोर आणू, पुन्हा मलिक यांनी दिले चॅलेंज

समीर वानखेडेंबाबतची अनेक सत्य आम्ही जगासमोर आणू, पुन्हा मलिक यांनी दिले चॅलेंज

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर बनावट डॉक्युमेंट्सच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. यासोबतच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर इतरही अनेक गंभीर आरोप लावले आहेत. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी त्यांच्या मुलीचा सीडीआर मागण्यावरून समीर वानखेडेंवर घणाघाती टीका केली आहे.

मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले की, समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडून माझ्या मुलीचा सीडीआर मागवला. सीडीआर गुन्हेगारांचा मागितला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीची खासगी माहिती मागवली जातेय? असा सवाल नवाब मलिकांनी वानखेडेंना विचारला आहे.

मलिक यांनी वानखेडेंना ‘हिंमत असेल तर माझ्या मुलीचा सीडीआर मागाच. त्यातही आम्ही कायदेशीर लढाई लढू’ असा इशारा दिला आहे. यानंतर त्यांनी ‘समीर वानखेडे २ लोकांचे फोन टॅप करत असून लोकांच्या फोनला इंटरसेप्ट करत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय ‘आज नाही तर उद्या हेही आम्ही जगासमोर आणणार आहोतच’, असंही मलिक यांनी सांगितलं आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments