R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या स्वीट कपल फोटोतून नवाब मालिकांनी जाहीर केले वनखडेंच्या पहिल्या लग्नाचे फोटो

स्वीट कपल फोटोतून नवाब मालिकांनी जाहीर केले वनखडेंच्या पहिल्या लग्नाचे फोटो

 

मुंबई | एनसीबीने केलेल्या ड्रग्स प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेले पाहायला मिळत आहे. त्यातच मलिक समीर वांकडें संदर्भात रोज नवनवीन खुलासे करताना दिसून येत आहे. त्यातच आज पुन्हा एक ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

आज सकाळी नवाब मलिक यांनी ट्विटवर शुभ प्रभात म्हणत समीर वानखेडेंबाबतचा नवा खुलासा केला आहे. मलिकांनी वानखेडे यांचा निकाहनामा ट्वीट करून जारी केला आहे. तसेच मलिकांनी समीर वानखेडेंच्या पहिला लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि म्हटलं आहे की, ‘स्वीट कपल समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी.’ दरम्यान या लग्नात ३३ हजार रुपयांची मेहर घेण्यात आल्याचे मलिकांनी सांगितलं आहे.

नवाब मलिकांनी पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘७ डिसेंबर २००६ रोजी गुरुवारी रात्री ८ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचं लग्न पार पडलं. हे लग्न मुंबईतील अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये झालं होत.’

दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘या लग्नात ३३ हजार रुपयांचा मेहर घेण्यात आला होता. यामध्ये २ नंबरचा साक्षीदार अजीज खान होते. समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांचे अजीज खान पती आहेत.’ या ट्वीटनंतर नवाब मलिक यांनी स्वीट कपल म्हणत समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो शेअर केला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments