R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति ‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

 

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ तस्करीत ८ महिने तुरुंगवास भोगावे लागल्याने पोटशुळ उठलेल्या ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक हे प्रामाणिक हिंदू-मराठी अधिकारी असलेल्या समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या खाजगी आयुष्यावर अतिशय खालच्या पातळीवर जात खोटे आरोप करत त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे षड्यंत्र रचत असताना, कायम हिंदू व मराठी विषयी पुळका असल्याचे दाखवणारे मुख्यमंत्री महोदय, आपण गप्प का? असा सवाल मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मंत्री नवाब मलिक करीत असलेल्या ‘लाय ट्रायलच्या’ निषेधार्थ व समीर ज्ञानदेव वानखेडे करीत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाकडून मुंबईसह राज्यात अंमली पदार्थ तस्करीचे दिवसागणिक रॅकेट उघड केले जात असताना व वर्षभराच्या काळात १७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ व ३०० पेक्षा जास्त ड्रग्स माफियांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचे सोडून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री मात्र अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात, त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खोटे दावे करत त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा बेशरमपणा करत आहेत असं यावेळी यावेळी बोलून दाखविले होते.

आज महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी दलाला सक्त आदेश देत राज्यातील अंमली पदार्थ तस्करीची पाळेमुळे उखडून टाकण्याचे काम करणे सोडून केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांवरच पाळत ठेवण्याचे काम मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे, यातून महाविकास आघाडी सरकार ड्रग्स माफियांना पाठीशी घालत असून नवाब मलिक यांनी तर ड्रग्स माफियांकडून जणू सुपारी घेतली असल्याचे स्पष्ट दिसत असल्याची टीका सुद्धा आ.भातखळकर यांनी यावेळी केली.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments