R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

 

उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. उल्हासनगरमध्ये भाजपच्या २१ विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेशामध्ये १९ माजी नगरसेवकांनीदेखील हातावर घड्याळ बांधलं आहे. भाजपचे आणखी १० नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले सर्व नगरसेवक आज स्वगृही परतले आहेत. या बदललेल्या समीकरणामुळे उल्हासनगरमध्ये आता पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबाची मध्यरात्री बंद दाराआड चर्चा केल्यानंतर शहरात राजकीय घडामोडीला वेग आला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा सोनिया धामी यांची मंगळवारी रात्री प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्यावर, शहरजिल्हाध्यक्ष पदी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आज बुधवारी पंचम कलानी यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे दिल्यावर, त्यांची राष्ट्रवादीच्या शहरजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पंचम कलानी यांनी आज आपल्या इतर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments