R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करताना दिसून येत आहे तसेच मतदारांना लुभावण्यासाठी चढाओढीने पुढे चालले आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि अरविंद आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी अयोध्येत जाऊन राम लल्लांचे दर्शन घेतले आणि सायंकाळी शरयूच्या आरतीतते सामील झाले. आज केजरीवाल यांच्या दिल्ली कॅबिनेटने मुख्यमंत्री मोफत तीर्थयात्रा योजनेत अयोध्येचा समावेश केला आहे. ही योजना अरविंद केजरीवाल यांचे पेटंट योजना मानली जाते. दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना मोफत लागू आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबातील किंवा नजीकच्या एका व्यक्तीला आपल्याबरोबर तीर्थयात्रेत मोफत देऊ शकतात.

आतापर्यंत अयोध्येचा यात्रेत समावेश नव्हता. फक्त चार धाम यात्रा आणि निवडक धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश होता. परंतु, आता उत्तर प्रदेश निवडणूक जवळ आल्यामुळे अरविंद केजरीवाल सरकारने अयोध्येचा देखील मुख्यमंत्री मोफत तीर्थयात्रा योजनेत समावेश करून उत्तर प्रदेशातील मतदारांना वेगळ्या प्रकारे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments