R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळायलाच हवेत, कृषी मंत्री दादा भुसे यांची कंपन्यांच्या प्रतिनिधींना...

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळायलाच हवेत, कृषी मंत्री दादा भुसे यांची कंपन्यांच्या प्रतिनिधींना तंबी

 

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळायलाच हवेत अशी तंबी कृषी मंत्री दादा भूसे यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत राज्यात काम करणाऱ्या ६ कंपन्यांच्या प्रतिनिधींना मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली आहे. त्यामुळे येन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भात लवकरच कारवाई करण्याचे आदेश मंत्री भुसे यांनी दिले आहेt.

काल रात्री उशीरापर्यंत झालेल्या या बैठकीत कृषी मंत्री भूसे तसेच कृषी सचिव एकनाथ डवले ऑनलाईन सहभागी झाले होते. कृषी आयुक्त धीरजकुमार, सांख्यिकी विभागप्रमुख विनयकुमार आवटे तसेच राज्यात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. जूलै ते सप्टेबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

तसेच यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेत राज्यातील ८४ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३३ लाख ५२ हजार जणांनी नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडे दावा दाखल केला आहे. त्यातील १० लाख जणांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीने पहा व दावे मंजूर करा, दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असे पहा, त्यासाठी कर्मचारी वाढवावे लागतील तर वाढवा असे मंत्री भूसे यांनी बैठकीत उपस्थित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments